To blog or not to blog असा विचार करत बरीच वर्षं गेली आणि आज अचानक to blog असं वाटलं. अजून एक काम कशाला वाढवा, असं वाटायचं. (नेहेमीप्रमाणे आरंभशूरपणा तर होणार नाही ना, अशी भीतीही आहेच.) पण जेव्हा अमिताभ बच्चनसुद्धा ब्लॉग लिहितो हे वाचलं तेव्हा वाटलं की एवढा बिझी माणूस जर वेळ काढू शकत असेल तर आपल्याला सबब सांगायला जागाच नाही. त्याच सणकीत सुरुवात तर केलीये...
इतर कुणाला वाचावंसं वाटेल असं लिहिता येणं किती अवघड आहे याची जाणीव असल्यानं जे कुणी तसं लिहू शकतात त्या सर्व मंडळींबद्दल नितांत आदर वाटतो. प्रवीण टोकेकर हे त्यातल्या नव्या पिढीतलं एक आघाडीचं नाव. काय अफाट लिहितो हा माणूस! लोकप्रभामधला ’तथ्यांश’ वाचून दाद गेली नाही असं होणं जवळजवळ अशक्य! अगदी ताजं उदाहरण म्हणजे मागच्या आठवडयातला हा लेख.
http://www.loksatta.com/lokprabha/20090605/tathya.htm
आवडला का ते जरूर लिहा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment